गुरुपौर्णिमानिमित्ताने ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार (व्हिडीओ)

dr...

जळगाव प्रतिनिधी ।  गुरुपौर्णिमानिमित्ताने आज मंगळवार रोजी कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार समारंभ आयएमए हॉलमध्ये दुपारी ३.३० वाजता घेण्यात आला. यावेळी प्रमूख पाहूणे ह.भ.प दादा महाराज जोशी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सत्कारमुर्ती डॉ.उल्हास पाटील आणि डॉ. राजेंद्र पाटील यांचा शाल श्रीफळ आणि धन्वंतरी देवीची मुर्ती देऊन सत्कार दादा महाराज जोशी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सत्कारमूर्ती यांचा जीवन परिचय बाबत माहिती देण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागीरदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज जोशी, सत्कारमूर्ती डॉ. उल्हास पाटील व डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील अनूभवी व ज्येष्ठ डॉक्टर यांची उपस्थिती होती.

 

Protected Content