ना. गुलाबराव पाटील यांनी गटसचिवांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न सोडवला (व्हीडीओ)


जळगाव प्रतिनिधी । ना. गुलाबराव पाटील यांनी गटसचिवांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न सोडविल्यामुळे त्यांनी पुकारलेला संप आज मागे घेण्यात आला आहे.

 

गटसचिव हा गावातील विविध कार्यकारी सोसायटीचा कर्मचारी असून स्थानिक अर्थकारणाशी संबंधीत एक महत्वाचा घटक आहे. विशेष करून शेतकर्‍यांना मिळणारी शासकीय मदत आणि कर्जमाफीसारख्या योजनांची अंमलबजावणी, शेतकर्‍यांना मिळणारे कृषी कर्ज या बाबी विकासोच्या माध्यमातून होत असून यात गटसचिवांची भूमिका अतिशय निर्णायक अशीच आहे. दरम्यान, गटसचिवांचे वेतन थकीत असल्याने त्यांनी संप पुकारला होता. राज्य सरकारने अलीकडेच कर्जमाफी जाहीर केली असली तरी गटसचिव संपावर असल्याने शेतकर्‍यांना याला लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्‍वभूमिवर, आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची गटसचिव संघटनेसोबत बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ना. पाटील यांनी थकीत वेतन तातडीने अदा करण्यासाठी दीड कोटी रूपये वर्ग करण्याच्या सूचना केल्या. यामुळे गटसचिवांच्या वेतनाचा प्रश्‍न मार्गी लागली. यामुळे गटसचिवांनी आपला संप मागे घेतला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2514083432195471

Protected Content