जळगाव प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोरोना झाल्यास सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचे सांगितले असले तरी देव करो आणि त्यांना कोरोना होवू नये अशी प्रतिक्रिया आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर भाजपने महाराष्ट्रात सत्ता बदलाचे स्वप्न पाहू नये असा इशारा देखील त्यांनी दिला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अलीकडेच जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी मला कोरोना झाल्यास सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याबाबत गिरीश महाजन यांना म्हणाले होते. यावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांना उपचारासाठी कुठेही दाखल केले; तरी शासनाची धावपळ उडणार आहे. पण त्यांना कोरोनाची लागण ना होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना असल्याचे पाटील म्हणाले.
ना. गुलाबराव पाटील यांनी या पत्रकार परिषदेत भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की भाजपने मध्यप्रदेशात सत्ता बदल केली; हा विषय जुना झाला आहे. मात्र त्यांनी राजस्थानमध्ये हा प्रयत्न करून पाहिला त्या ठिकाणी भाजपला पटकी खावी लागली. यामुळे त्यांनी महाराष्ट्रात सत्ताबदलच्यादृष्टीने पाहूच नये. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे तब्बल १७० आमदार आहेत. बहुमतापेक्षा अधिक आमदार आहेत. तब्बल ५० आमदार फोडायचे म्हणजे काय बाजारात जावून बैलजोडी खरेदी करण्याइतके ते सोपे नसल्याचा टोला त्यांनी मारला.
पहा गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते !
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/273991963857848