बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरूवार, दि. १० रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे गुरूवार, दि. १० नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. यात सकाळी सात वाजता ते शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता देऊळगाव साकर्षा येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करणार आहेत.
यानंतर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता जानेफळ येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता डोणगाव येथे आचार्य श्री विद्यासागर महाराजांचे दर्शन घेतील. दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील. दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूसंपादन कार्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी ४ वाजता पाणी आरक्षण आणि इतर संवैधानिक बैठकीस उपस्थित राहणार आहेत.