नशिराबाद , प्रतिनिधी | आपल्या मतदारसंघात एमआयडीसी किवा उद्योग धंदा न उभारता यांनी वाईन शॉप खुले केले असा आरोप जानकीराम पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्यावर केला.ग्रामीण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ नशिराबाद येथे आज (दि.१७) सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
जानकीराम पाटील पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटील जानकीराम यांच्यावर बोतल नाही कारण ते मराठा समाजाचे आहेत. संजय महाजन यांच्यावर बोलत नाही कारण ते माळी समाजाचे आहेत. गुजर समाजातील पी. सी. पाटील व लकी अण्णा यांच्यावरच का बोलतात का बोलतात असा प्रश्न उपस्थित करत यांच्यावर बोलून टाइम पास करून मते मागत आहेत असा आरोप केला. यावेळी जळकीकर महाराज यांनी सांगितले की, एकेकाळी कट्टर विरोधक असलेले आम्ही तिघेजण म्हणजे मी, जानकीराम पाटील आणि लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर आम्ही एकत्र का आलो ? कुणामुळे आलो ? एकाच व्यक्तीच्या खोटारडे पणामुळे आम्ही एकत्र आलोय, आमचं असं काय चुकलं म्हणून आम्हाला यांनी दूर केलं ? ते पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटील आम्हाला गद्दार म्हणतात, मी मान्य करतो की, आम्ही गद्दार आहोत. पण आधी तुम्ही किती प्रामाणिक आहात ते तर सांगा. हे आम्हाला माकडं म्हणतात पण हेच माकडं आता त्यांची लंका पेटवणार आहेत. सहकार मंत्री असून गुलाबरावांनी मतदार संघात कुणालाही रोजगार दिला नाही, केवळ स्वत:चे बिअर बार काढले, त्याऐवजी दोन सूतगिरण्या जरी काढल्या असत्या तर आज त्यांना मतदारसंघात मत मागायला जाण्याची गरज पडली नसती. यासभेत अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे, त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे हे ही व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/959633211046053/