राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई प्रतिनिधी । ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारने आता आणखी बाबींमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता राज्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये ५०% क्षमतेनेच सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

* राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर 

* हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

* ५० % क्षमतेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी

* डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी

* अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणार

* डबेवाल्यांसाठी क्यूआर कोड देण्यात येणार

* राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक्सप्रेस सुरू

* शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत

* मेट्रो सेवा सुद्धा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहे

* सिनेमागृह, स्विमिंगपूल, इंटरटेन्मेंट पार्क, थिएटर बंद राहणार

* नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधणकारक आहे.

* सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालन करणे अनिवार्य आहे.

 

 

Protected Content