चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाळासाहेब ठाकरे कृषी व्यावसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (स्मार्ट कॉटन) अंतर्गत मौजे सांगवी येथे कापुस वेचणी पुर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रकल्पाअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून संबंधित गावातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत गटामार्फत कापसाची प्रक्रिया करून गाठी तयार करून व विक्री करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात स्वच्छ कापुस वेचणी, योग्य प्रकारे साठवण या बाबत सविस्तर माहिती दिली तसेच स्वच्छ कापुस वेचणीचा फायदा शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आला. तसेच प्रकल्पाअंतर्गत कापूस प्रक्रिया करून गाठी तयार करुन विक्री बाबत सविस्तर माहिती मल्टी टास्क ग्रेडर अमोल थोरात यांनी माहिती दिली.यावेळी कृषी सहायक बी.डी.लाड , विघ्नहर्ता शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय देशमुख गट प्रवर्तक विनोद देशमुख व प्रकल्पातील इतर शेतकरी उपस्थित होते.प्रशिक्षणाचे आयोजन व आभार प्रदर्शन कृषी सहायक तुफान खोत यांनी केले.