यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० वर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
यात प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पुढील वर्षी २०२४व२०२५ पासून सुरू होणार आहे. शैक्षणिक धोरणात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे, तसेच विद्यार्थ्याला कोणतेतरी कौशल्य अवगत झाले पाहिजे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शैक्षणिक धोरण५+३+३+४ यावर आधारित राहणार आहे. पदवी परीक्षेला प्रवेश घेण्यापूर्वी चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. पदवी घेत असताना श्रेयांक पद्धत अवलंबली जाणार असल्याचे सांगीतले,तसेच अनेक मुद्द्यांविषयी प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. कापडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सी. के. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. मयूर सोनवणे, प्रा. सि. टी. वसावे डॉ. संतोष जाधव प्रा. सुभाष कामङी, प्रा. तडवी प्रा. इ. आर. सावकार आदींनी परिश्रम घेतले.