आसोदा प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात नैसर्गिक रंग बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन हरितसेनेतर्फे करण्यात आले. याप्रसंगी हरितसेनेचे गोपाळ महाजन यांनी सर्वप्रथम कृत्रिम रंगात असलेले घटक व त्यापासून होणारे विविध आजार याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी पळस, झेंडू, गुलाब, बोगनवेल, ही फुले व पालक, हळद, कुंकू, नीळ, बीट इत्यादी पासून रंग बनवून दाखवले. रंगपंचमीचे शास्त्रीय महत्व स्पष्ट केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी यांनी नैसर्गिक रंग खेळून होळीचा आनंद द्विगुणीत करण्याचे आव्हान केले. विद्यार्थ्यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका विद्या खाचणे यांनी होळी सणाविषयी माहिती सांगितली व लाकूड न जाळण्याचे आव्हान केले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव कमलाकर सावदेकर, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जंगले व आभार प्रेमराज बऱ्हाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना महाजन, अनिता पाटील, भारती पाटील, स्वाती वाघूळदे व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.