मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील, दीक्षा सोनवणे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कोथळी येथे शेतकऱ्यांना युरिया व गूळ यांचा वापर करून चारा उपचार कसा करावा व त्याचे फायदे काय याबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले.



यावेळी साधारणत एक लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ ५० ग्रॉम मीठ व ९ ग्रॅम युरिया एकजीव करून १ किलो वाळवलेल्या चाऱ्यावर शिंपडून मिश्रण केले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. हा चारा गुरांना दिल्यामुळे त्याची पचनशक्ती वाढून त्याना पोषकद्रव्ये मिळतात. या कार्यक्रमाकरिता प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए. डी. मत्ते व समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले .


