फैजपूर, प्रतिनिधी | येथील धनाजीनाना महाविद्यालयात, येथील पोलीस स्टेशन आणि विद्यार्थी कल्याण विभागातर्फे ‘सायबर क्राईम’ या विषयावर आज (दि.३१) मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे उपस्थित होते.
ते यावेळी म्हणाले की, चार भिंतींच्या आतील गुन्हा म्हणजे सायबर क्राईम असतो. त्याचबरोबर सायबर गुन्ह्याचे स्वरुप तो कसा व का घडतो. अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, त्या संदर्भातील कायदे सांगून स्वताचा बचाव कसा करावा, याबद्दल त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सूरक्षेसाठी पोलीसकाका व पोलीसदीदी मदतीला कार्यरत राहणार आहेत. धनाजी नाना महाविद्यालयात ज्ञानेश्वर पवार पोलीसकाका व मदिना तडवी यांची पोलिसदीदी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घ्यावा, पण आपल्या हातून कुणाचे नुकसान होणार नाही, याचेही भान ठेवावे, असे आवाहन केले. विद्यार्थी विकास प्रमुख डॉ.गोपाळ कोल्हे यांनी प्रास्तविकातून कार्यक्रमाचा आयोजनासंदर्भातील भूमिका विषद केली. प्रा.डॉ. सिंधू भंगाळे, प्रा.डॉ. नितिन चौधरी, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. दीपक सूर्यवंशी, मोहन लोखंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्रा.डॉ. कल्पना पाटील यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संखेने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.