जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या वतीने आंतरविद्याशाखीय अणुप्रयोगांसाठी नवीन उपकरणे या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
आयआयटी, मुंबई येथील प्रा. के. अनिल व प्रा. गिरीष जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ. ए.डी. शालिग्राम आणि इंदोर येथील वैज्ञानिक संशोधन केंद्राचे डॉ. उदय देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. “ऊर्जा संक्रमण आणि फोटोव्होल्टेइकची भूमिका” या विषयावर प्रा. के. अनिल यांनी चर्चा केली. प्रा. गिरीश जोशी यांनी अलीकडील वैज्ञानिक प्रगती सांगत पॉलिमरिक मटेरियल आणि उपकरणांच्या समकालीन संदर्भातील माहिती दिली तर प्रा. अनिल शालिग्राम यांनी श्वाश्वत विकासासाठी उत्तम संशोधन यावर स्पष्टीकरण केले. प्रा. उदय देशपांडे यांनी वैज्ञानिक संशोधन केंद्राविषयीची माहिती दिली. दुपारच्या सत्रात पोस्टर्स सादरीकरण झाले. त्यामध्ये दिपश्री अहिरराव हिने प्रथक, लक्ष्मी पाटील हिने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. तर अभिषेक चौधरी व निकिता वडदकर यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकाविला. याचर्चासत्राचे समन्वयक डॉ. जसपाल बंगे होते. प्रशाळेचे संचालक प्रा. ए.एम. महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी.जे. शिरोळे यांनी समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त केले.