रावेर तालुक्यात दुष्काळ निधीत दिरंगाई झाल्याचा आढावा घेणार : पालकमंत्री

51c4df93 ede0 4e70 a36a 493b7f563627

रावेर (प्रतिनिधी) रावेर तालुक्यात शेतक-यांना दुष्काळी निधी वितरण प्रकरणाचा आढावा घेतोय येत्या दोन-तीन दिवसात यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लाईव्ह टेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले. त्यामुळे दिरंगाई कोणी केली, याचा आढावा घेणे आता सुरु झाले आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्याला शासनाने कोटयवधी रूपयांचा दुष्काळ निधी देऊन सुध्दा संबंधीत अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत राहीले व वाटप करण्यात विलंब केला म्हणून आज या विषयावर महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून असुन प्रशासन पटा-पट निधी वर्ग करीत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांनंतर दिरंगाई करणा-या कोणत्या अधिका-यांवर कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

दुष्काळी कामांचा लोड तहसीलदारांवर असला तरी तहसीलवर सुपरव्हिजन करणारे व उठ-सूट रावेरला ठाण मांडून बसणारे फैजपुरचे प्रांताधिकारीसुध्दा याला जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. कारण करोडो रुपयांचा दुष्काळ निधीचा साधा फॉलोअपही दोघांपैकी कोणीच घेतला नाही म्हणून बँक कर्मचारी बिनधास्त राहीले. या सर्व मंडळींनी निष्काळजीपणाचा कळसच गाठला आहे. या प्रकरणाची दखल खुद्द महसूलमंत्र्यांनी घेतल्याने आता कोणती कारवाई होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Add Comment

Protected Content