Home Cities जळगाव पालकमंत्री चंदकांत पाटील यांचा जळगाव दौरा रद्द

पालकमंत्री चंदकांत पाटील यांचा जळगाव दौरा रद्द


 

जळगाव (प्रतिनिधी) आज दुपारी शहरातील शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या भूमिपूजन सोहळा आहे. पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. परंतु मातोश्रीवर आज युतीसंदर्भात महत्वपूर्ण बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शहा येत आहेत. त्यामुळे ना.पाटील यांचा आजचा जळगाव दौरा रद्द झाला आहे.  दरम्यान, ना.पाटील यांचे स्वीय सहायक दीपक परदेशी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या शुभहस्ते आज शिवाजी नगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज दुपारी ४ वाजता केले जाणार होते. परंतु आज मुंबईत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा हे शिवसेना-भाजप युतीवर अंतिम शिक्कमोर्तब करण्यासाठी येणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे कळते. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकात पाटील हे देखील आज मातोश्रीवर जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा आजचा जळगावदौरा रद्द झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound