गृह सचिवांच्या भेटीसाठी भाजप नेते दिल्लीत दाखल 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या घडत असणार्‍या घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर, राज्यातील भाजप नेते दिल्लीत दाखल झाले असून ते केंद्रीय सुरक्षा सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांवर शनिवारी रात्री शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजता हे शिष्टमंडळ भल्ला यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे , आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश आहे.

सोमय्या यांनी राण दाम्पत्यालाा भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चपलांचा पाऊस बरसवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात कॉल झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा अमित शाहांनी घेतला. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट मिळणार का याकडेही लक्ष लागलं आहे.

 

Protected Content