Home क्राईम पुण्यात परदेशी तरूणीवर सामुहिक बलात्कार

पुण्यात परदेशी तरूणीवर सामुहिक बलात्कार

0
70

पुणे प्रतिनिधी । घरी जाणासाठी लिफ्ट मागितलानंतर लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने मित्राला बोलवून शहरातील धानोरीजवळच्या मैदानात परदेशी तरूणीवर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरूणीने झालेल्या अत्याचारासंबंधी पहाटे विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी मूळची युगांडा देशाची असून ती तिच्या बहिणीसोबत कोंढवा परिसरात राहते. ती टुरिस्ट व्हिसावर आली असून, ती कपड्यांचा व्यवसाय करते. सोमवारी रात्री ती मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. रात्री 12 वाजता ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती. त्यावेळी एक तरुण बाईकवर तिच्याजवळ आला. त्याने इंग्रजीमध्ये बोलत लिफ्ट देतो, असे सांगितले. त्यामुळे तरुणी त्याच्या बाईकवर बसली. काही अंतर गेल्यानंतर त्याला एका व्यक्तीचा फोन आला. नंतर ती व्यक्ती रस्त्यात भेटली. त्यांनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विमानतळ पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही व तरूणीने सांगितेल्या क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.


Protected Content

Play sound