रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अजंदा येथे गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी अचानक भेट देवून कोरोनाविषयी जनजागृती केली.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी तालुक्यातील निंबोल व अजंदे येथील ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन, प्रलंबित घरकुल योजना, कर वसूली याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी कोतवाल यांनी सोशल डिस्टंसींगचे पालन करा, माक्स वापरण्याचा सल्ला ग्रामस्थाना दिला. सोबत गावातील जिल्हा परिषद शाळांना व्हिजीट देखिल व्हिजीट दिल्या. याप्रसंगी त्यांच्या सोबत विस्तार अधिकारी श्री सोनवणे, ग्रामसेवक एम.डी.पाटील आदी सोबत होते.