अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पेट्रोल पंपाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी शेतकरी बांधवांसाठी अल्पदरात शेतातील माती परिक्षण मिळावे यासाठीचे मशीनचे देखील उद्घाटन पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी विधानपरिषद शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, सर्व प्रशासक मंडळ सदस्य, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सचिव व सर्व कर्मचारी वृंद कृ.उ.बा.समिती, अमळनेर तसेच पातोंडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.