चोपडा येथील कनिष्ठ महाविद्यालयात महात्म्यांना अभिवादन

back

चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात नुकतीच लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशाल थोरात, कांचन पाटील, अर्चना कोळी यांनी दोघं महापुरूषांबद्दल मनोगतं व्यक्त केली. पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय. पाटील यांनी अण्णाभाऊ साठे तर प्रा.एन.बी. शिरसाठ यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती सांगितली. सुत्रसंचालन प्रा.एस.एन. नन्नवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल महाजन यांनी केले आहे.

Protected Content