पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील भडगाव रोडवरील संभाजी चौक येथे दि.१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रयत सेनेचे तालुकाध्यक्ष रमाकांत पवार व अनिल पाटील, ए.जे. महाजन, चंद्रकांत दतु, देवा निकम, इरफान शे मन्यार, वसंत देशमुख, विनायक मोरे, विश्वनाथ महाजन, देविदास पाटील, अशोक सुरवाडे, प्रभाकर बोरसे, शशिकांत बोरसे, इस्माईल मन्यार, अनिल नागणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.