बांबरूड (राणीचे) येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि. १२ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांना विद्यालयातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण, प्रतिमापूजन प्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, दगाजी वाघ, नाना देवरे, हारुण देशमुख, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, विद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. पाटील, पी. वाय. मोरे, बाळु वारुळे, विवेक पाटील यांचे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content