Home Cities धरणगाव बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात नेहरूंना अभिवादन

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात नेहरूंना अभिवादन

0
58

balkavi

धरणगाव प्रतिनिधी । येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई कुडे विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.

सकाळ सत्रात उपशिक्षिका वर्षा पाटील व वाय.पी. पाटील तसेच दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील यांनी माल्यार्पण केले. तसेच सर्व उपस्थितांनी पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound