जळगाव, प्रतिनिधी । थोरसमाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना शिवसेना बळीराम पेठ शाखा व आझाद क्रिडा सांस्कृतिक मित्र मंडळचा वतिने सेट्रंल फूले मार्केट येथे जाऊन माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.
महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख विपीन पवार, शिवसेना उपविभाग प्रमुख जितेद्रं गवळी, रुपेश पाटील, मयुर महाजन, गोलु पिगंले, पवन गुप्ता आदी शिवसैनिक उपस्थित होते.