यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायत आमोदा तालुका यावल यांचे तर्फे सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य यांचे उपस्थितीत डॉ .बाबासाहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेबाच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सरपंच जुगराबी लतीब तडवी, ग्रामपंचायत अधिकारी गौतम वाडे, पोलीस पाटील तुषार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुमार पाटील, हेमराज पाटील, आमोदा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी गौतम तायडे, संजू तडवी यांच्यासह आदी उपस्थित होते
ग्रामपंचायत अधिकारी गौतम वाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकार टाकला. सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शन गौतम तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.