Home Cities जळगाव भाजपतर्फे खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन !

भाजपतर्फे खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन !

( Image Credit Source : Live Trends News )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देशकन्या प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या माहेरी अर्थात आसोदा गावी अभिवादन करण्यात आले.

( Image Credit Source : Live Trends News )

 

आज निसर्ग कवयित्री खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांची १४१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षातर्फे आसोदा येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर, महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, बहिणाबाई स्मारक समितीचे किशोर चौधरी यांच्यासह अन्य सदस्य तसेच नगरसेविका शुचिता हाडा, दीप्ती चिरमाडे आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी प्रारंभी बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी बहिणाबाईंच्या माहेरच्या वाड्याला भेट दिली. यानंतर बहिणाबाई चौधरी यांच्या रखडलेल्या स्मारकाला भेट देऊन येथील पाहणी देखील करण्यात आली.


Protected Content

Play sound