मू.जे.महाविद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त अभिवादन

Untitled 1

जळगाव, प्रतिनिधी | मूळजी जेठा महाविद्यालय मुलांचे वसतिगृह येथे कारगिल विजय दिनानिमित्त अभिवादन पर सभा घेण्यात आली. भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून शहीदांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

वसतिगृहातील विद्यार्थांनी देशभक्तीपर गीत सादर केले. राष्ट्रनिर्माण, स्वाभिमान, कर्तव्य, हक्क, राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर प्रा. पंकज खाजबागे यांनी विचार प्रकट केले. धर्म, जात, पंथ न जुमानता आपली ओळख आपण भारतीय आहोत असे मत प्रा. डॉ. सहदेव जाधव यांनी व्यक्त केले. प्रा. दिनानाथ पाठक यांनी कारगिल विजयाची शौर्यगाथा सांगितली विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” “वंदे मातरम्” घोषणा देत नवचैतन्य निर्माण केले. या प्रसंगी प्रा. पंकज खाजबागे, डॉ. सहदेव जाधव, प्रा. दिनानाथ पाठक, प्रा. सचिन चन्नावत, मुकेश पाटील व समस्त विद्यार्थी उपस्थित होते. अश्विन सुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले.

Protected Content