धरणगाव, प्रतिनिधी | येथील महात्मा फुले हायस्कूल येथे ‘राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब’ व ‘युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही. टी. माळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पी. आर. सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पुरोगामी विचारांचे – अभ्यासु व्यक्तिमत्व लक्ष्मण पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. लक्ष्मण पाटील यांना शाळेच्या वतीने क्रांतीवीर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र पर पुस्तक भेट देण्यात आले. श्री. पाटील यांनी जिजाऊंची जीवनगाथा सांगितली.तसेच त्यांनी विवेकानंद कार्याची माहिती दिली. कार्यक्रम अध्यक्षा पी.आर. सोनवणे यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा मोलाचा संदेश दिला. सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही. टी. माळी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. व्ही. आढावे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.