पारोळा प्रतिनिधी । येथील निवास भाऊ शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पारोळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पारोळा तालुका अध्यक्ष अँड. अतुल मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारतातील एकमेव असे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे साधी राहणी उच्च विचार असलेले असे एकमेव पंतप्रधान होते. यांच्या विचारांची गरज संपूर्ण भारताला आहे. यांच्या विचारसरणीवर भारतीय राजकारण्यांनी अंमल केल्यास भारतात आदर्श राजकारणी निर्माण होतील.
याप्रसंगी पारोळा शहर अध्यक्ष मुकुंद चौधरी, गोपाल दाणेज, सचिन गुजराथी, रवींद्र पाटील, धिरज महाजन, कैलास चौधरी, नरेंद्र राजपूत, छोटू बोहरा, अशोक ललवाणी, विकास सोनवणे, अनिल टोळकर, अनिल वाणी, विठ्ठल वाणी, गणेश शत्रिय, विशाल शिंपी यांच्यासह अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.