पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील शिवसेनेच्यावतीने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने पारोळा येथील शिवसैनिकांतर्फे त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब यांचा आज आज सातवा स्मृती दिवस आहे. यानिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करताना पारोळा बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक आमोल पाटील, मधुकर आबा पाटील, उपसभापती कृषी उत्पनबाजार समिती शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, शिवसेना उपशहर प्रमुख भूषण भोई, पंकज मराठे व सर्व शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.