यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त लेवा गण बोली दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख म्हणुन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शनाने करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, उपप्राचार्य डॉ.एस.पी कापडे, प्रा मनोज पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एस. पी. कापडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय पाटील यांनी अद्वितीय स्त्री शक्तीचे प्रतीक समाज सुधारक आणि मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा असलेल्या बहिणाबाई चौधरी यांचा जीवनपट सादर केला. त्यांच्या साहित्यातून स्फूर्ती घेऊन आजच्या पिढीने ही जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जायला शिकले पाहिजे असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
बहिणाबाईंची एक प्रसिद्ध कविता “अरे संसार संसार” या कवितेचे वाचन तेजस्विनी कोलते या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मनोज पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. इम्रान खान, प्रा. सी. के. पाटील, प्रा. आर. एस. ठिगळे, प्रा. आर. एस. तडवी, प्रा. ए स डी कदम, प्रा. निकिता पाटील, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, सोनाली पाटील, अश्विनी कोल्हे, प्रा. मुकेश येवले, मिलिंद बोरघडे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.