पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील रेल्वे स्टेशन रोडवरील होऊ घातलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ महिलांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, अॅड. भाग्यश्री महाजन, अॅड. मनिषा पवार, अॅड. कविता रायसाकडा, सुनिल शिंदे, मा. नगरसेवक वासुदेव महाजन, नथू महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व त्यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या शिक्षणाचा पाया रोवून केलेल्या प्रचार व प्रसाराचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक अॅड. अविनाश भालेराव, अशोक मोरे, दत्ता जडे, किशोर डोंगरे, सुधाकर महाजन, शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुनिल पाटील, रमेश पाटील, मराठा सेवा संघाचे सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिभाऊ पाटील, राजू महाजन, एकता अॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदानशिव, अनिल लोंढे, नाना चौधरी, गौतम निकम, कोळी समाजाचे अध्यक्ष सुनिल मोरे, मराठा सेवा संघाचे राहुल पाटील, डी. एन. पाटील, अॅड. मिना सोनवणे, के. एस. महाजन, एम. एस. महाजन सह मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.