जळगाव, प्रतिनिधी | महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सोमवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांचे अनुयायी यासह महापालिकेतील सर्व सफाई कर्मचारी यांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती करून देशाला मोठे योगदान दिले आहे. यात स्वातंत्र्य, बंधूता आणि न्यायाच्या माध्यमातून प्रत्येक देशवासीयांना न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच देशात एकत्र व एक संघटीत राहण्याचा संदेश दिला” असल्याचे सांगितले.
याप्रसंगी महापौर जयश्री सुनील महाजन, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सहय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, संविधान जागर समितीचे मुकुंद सपकाळे, कॉंग्रेस शहराध्यक्ष श्यामकांत तायडे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, आदींचा समावेश होता.