भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शहरातील सावता महाराज मढी येथे सकाळी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करत आरती करण्यात आली. रथ मार्ग सजलेल्या ट्रॅक्टर वर सावता महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आमदार किशोर पाटिल, निर्मल सिड्स संचालिका वैशाली पाटील, पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मिरवणूक दरम्यान पुजन केले. यानंतर लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसादाचा आयोजित करण्यात आला होता.
लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, समाजअध्यक्ष साहेबराव महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भिकन महाजन, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर शिवदास महाजन, सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन विजय महाजन माजी नगरसेविका योजना पाटिल, माजी नगरसेविका वैशाली महाजन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील व अध्यक्ष साहेबराव महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक पाटील यांनी सत्कर्थी विद्यार्थींना चांगले शिक्षण घेऊन परिवार व समाजाचे नावलोकिक मिळवा असे मार्गदर्शन केले. तर समाज बांधवांनी यापुढे एकत्रित पणे समाज संघटन करून कार्य करू, विविध उपक्रम राबवू असे मार्गदर्शन साहेबराव महाजन यांनी सांगितले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी, बारावी, पदवीधर, पदवित्तर,मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान एस डी. महाजन, गट शिक्षण अधिकारी पदी नेमणूक झाल्या बद्दल व विजय महाजन हे पोलिस उप निरीक्षक पदाहून सेवानिवृत्त झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर,पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे, रविंद्र अहीरे, यांच्यासह पत्रकार अशोक परदेशी, नरेंद्र पाटील, संजय पवार, यांच्या सह अध्यक्ष साहेबराव महाजन, भिकन महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, विनोद महाजन, आप्पा महाजन, रमेश महाजन, नितीन महाजन, सुनिल महाजन, अशोक महाजन, गणेश महाजन, नीलेश महाजन, प्रकाश महाजन, अरुण महाजन, राहुल महाजन, बबलू महाजन, विजय महाजन, छोटू महाजन, रामगोपाल सैनी, अनिल महाजन, दत्तू महाजन, सुरेश महाजन, आदींसह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश रोकडे सर यांनी सूत्रसंचालन प्रविण महाजन सर यांनी तर आभार गोकुळ महाजन यांनी मानले.