जळगाव प्रतिनिधी । संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाकारी राहुल पाटील, तहसीलदार (सामान्य प्रशासन) सुरेश थोरात, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, नायब तहसीलदार अमित भोईटे, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.