जळगाव, प्रतिनिधी | स्व. राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंती निमित्त जळगाव शहर काँग्रेस भवन येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुचना व माहिती क्षेत्रात क्रांती घडवून,तरूणांना १८ व्या वर्षी मताचा अधिकार देण्यासारखे क्रांतिकारी निर्णय घेउन आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी प्रतिपादन केले.
माजी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी राजीव गांधी यांनी पंचायतराजच्या माध्यमाने स्थानिक स्वराज्य संस्थांना मजबूती दिली असे सांगितले. याप्रसंगी अॅड. सलिमभाई पटेल (मा.प्रदेश सचिव) यांनी महिला आरक्षण सारखे दूरदर्शी निर्णय राजीवजींनी घेतल्याचे सांगितले. सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सद्भावना शपथ दिली. याप्रसंगी नदीम काजी , शिवाजीराव शिंपी , ज्ञानेश्वर कोळी,जगदीश गाढे,मुजीब पटेल,मनोज चौधरी,योगेश देशमुख ,जाकिर बागवान ,उद्धव वाणी, राजेश कोतवाल ,गोकुळ चव्हाण,डी एस कुलकर्णी, मनोज वाणी , प्रदीप सोनवणे ,कैलास पाटिल,नारायण राजपूत आदी उपस्थित होते.