Home उद्योग भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा 

भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथून सांगलीकडे विशेष रेल्वेगाडी रवाना करण्यात आली. शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता विशेष रेल्वेगाडी क्रमांक 01209 भुसावळ रेल्वे स्थानकावरून भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. या रेल्वेच्या माध्यमातून भुसावळसह जळगाव, पाचोरा व चाळीसगाव परिसरातील भाविकांना समागमासाठी जाण्याची सोय करण्यात आली होती.

सतगुरु माताजी यांच्या असीम कृपेने तसेच झोनल इंचार्ज महात्मा हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले. संत निरंकारी मंडळाच्या विविध शाखांच्या सहकार्याने ही सेवा यशस्वीरीत्या राबविण्यात आली. रेल्वे रवाना होत असताना भजन, सत्संग आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

भुसावळचे आमदार व कॅबिनेट मंत्री संजय सावकारे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. रजनी सावकारे यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भुसावळ रेल्वे विभागातील अधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, समाजसेवक, अजय नागराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या विशेष रेल्वेमधून भुसावळ तालुका व संपूर्ण जिल्ह्यातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. भजन मंडळी, सत्संग मंडळी तसेच सेवादल सदस्यांची विशेष उपस्थिती लाभल्याने संपूर्ण प्रवास मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असल्याचे चित्र दिसून आले. भाविकांमध्ये उत्साह, श्रद्धा आणि सेवाभाव यांचे दर्शन घडले.


Protected Content

Play sound