भुसावळ संतोष शेलोडे । आज समाजात कोरोना पॉझिटीव्ह म्हटल्यानंतर अनेक जण हेटाळणी व घृणेच्या नजरेने बघत असतांना भुसावळ तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या दोन मुलींच्या पालनाची जबाबदारी येथील नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी उचलून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. विशेष बाब म्हणजे या दोन मुलींना बाधीतांचे नातेवाईक व शेजारच्यांनी सांभाळण्यास नकार दिल्या नंतर पिंटू कोठारी यांनी त्यांना मदत केली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील हतनूर धरणावरील कुटुंबांतील १० जणांपैकी ८ जणांचा अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आलेला होता.तर त्यातील दोघे लहान मुलींचा अहवाल निगेटिव्ह आला होता.कोरोना पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड सेंटर व रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आल्यानंतर त्या कुटुंबातील दोघे मुलींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यानां घरी पाठविण्यात आले.या दोघे मुलींचा सांभाळ करण्यास नातेवाईक व गावातील मित्रपरिवाराने विरोध दर्शविला. यामुळे त्या दोन्ही चिमुकल्या राहणार तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमिवर, भुसावळचे समाजसेवक तथा नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी व कविता कोठारी या दाम्पत्याने त्यांनी जबाबदारी उचलली.
या संदर्भात नगरसेवक निर्मल कोठारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोरोना व्हायरसची भीती नागरिकांनी बाळगण्याची गरज नाही. यावर उपचार होऊन रुग्ण आपल्या घरी बरे होऊन जाऊ शकतो.यासाठी नागरिकांनी कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा विरोध न करता त्यांचे मनोबल वाढवा.जर रुग्णांचे मनोबल वाढविल्यास अर्धा आजार गायब होतो. केव्हिड सेंटरला वयोवृध्द व्यक्तींची काळजी घेतली जात नसल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण होते ती काढणी गरजेची आहे.
तर, कविता कोठारी म्हणाल्या की, आम्हाला तलाठी रत्नांनी यांचा फोन आला व घटनेबाबत माहिती दिली असता या दोन्ही मुलींना आपच्या घरी आणून त्यांना आपल्या मुलीप्रमाणे वागणूक देण्यात येत आहे. दरम्यान, मुलींची आजी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याने त्यांच्या परिवारातील ७ जण कोरोनावर मात करून आपल्या घरी जाणार असल्याची माहिती निर्मल कोठारी यांनी दिली. तसेच दोघे मुलींना नगरसेवक निर्मल कोठारी व कविता कोठारी स्वतः त्यांच्या घरी पोहचविणार असल्याची माहिती मुलाखती दरम्यान दिली.
पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3343925392498472