चाळीसगाव प्रतिनिधी । सुमारे एक लाख रूपये किंमतीची सोन्याची चेन मुळ मालकाला परत करण्याचा प्रामाणिकपणा जितेंद्र परदेशी यांनी दाखविला असून यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत वृत्त असे की, सिद्ध मोबाईल संचालक आकाश पंजाबी यांचा दोन दिवसांपूर्वी रेल्वे पूल धुळे रोडवर अपघात झाला होता. त्यात पंजाबी हे जखमी झाले होते. तसेच याप्रसंगी त्यांची ३२ ग्राम सोने अंदाजे किंमत १ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हरविली होती. ही चेन जितेंद्र अशोकसिंग परदेशी (रा. नारायणवाडी चाळीसगाव) यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून मूल मालक अर्थात आकाश पंजाबी यांना डॉ सुनील राजपूत यांच्या साइकृष्ण हॉस्पिटलमध्ये प्रामाणिकपणे परत केली. यावेळी चाळीसगाव शहर पोलीस राजेंद्र चौधरी विजय शिंदे, हंसराज रावलानी, जयेश कारडा आदी उपस्थित होते. जितेंद्र परदेशी यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.