दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तिबेटमधील शिगात्से शहरात मंगळवारी (7 जानेवारी 2024) झालेल्या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 62 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. तिबेटमधील भूकंपामुळे झालेल्या विनाशानंतर बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
तिबेटमध्ये पहाटे तीन शक्तिशाली भूकंप झाले, या भूकंपाच्या धक्क्यांनी चीनसह नेपाळ, भारत, बांगलादेशसह इतर अनेक देश हादरले. यापूर्वी भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील लोबुचे क्षेत्र असल्याचे सांगितले होते परंतु नंतर ते बदलले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेट, चीनमध्ये होता, जिथे 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने जारी केलेल्या अहवालानुसार, भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. सकाळी 6.35 वाजता झालेल्या पहिल्या भूकंपानंतर दुसरा हादरा 7.02 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर 7.07 वाजता 4.9 तीव्रतेचा तिसरा भूकंप जाणवला