वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी युवकांची फ्रेंडशिप !

friends

चोपडा प्रतिनिधी ।  शाळा व कॉलेजमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ सगळेच साजरा करतात. मात्र, तालुक्यातील निमगव्हाण (ता.चोपडा) येथील तापी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सेवाभावी युवकांनी आजी-आजोबांसोबत मैत्री दिवस साजरा करून आदर्श घालून दिला. गप्पा , सत्कार व अल्पोहार वाटप असे कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. त्यामुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर यामुळे हास्य उमलले. वेले (ता.चोपडा) येथील अमर संस्था संचलित वृध्दाश्रमात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार जगभर ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो. मैत्री हे एक असं नात आहे की ते रक्ताचं नसलं तरी दोन मनांना व स्वतंत्र व्यक्तींना एकत्र आणणारं आहे. या दिवशी अनेक नवनवीन व्यक्ती मित्र होतात. तसेच छोट्या-मोठ्या कारणाने दुरावलेले मित्र एकत्र येतात. तसेच अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात व आपले एकमेकांसोबत असलेले मैत्रीचे संबंध व मैत्रीप्रेम फ्रेंडशिप बँड बांधून व्यक्त करतात.

मात्र, यामध्ये काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आणि समाजापासून काहीसे एकाकी असलेल्या वृध्दाश्रमातील आजी-आजोबांशी मैत्री करून हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे तापी फाऊंडेशन अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी अनेक उपक्रम घेण्यात आले. त्यांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधण्यात आला त्यानंतर त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्यात आल्या.या उपक्रमाने कुटुंबापासून दुरावलेल्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हसू उमललं.सदर उपक्रमात शशिकांत बिऱ्हाडे सर, सागर मोरे (पातोंडा), लिलाधर बाविस्कर यांचा सहभाग होता.यावेळी प्रकल्पाचे व्यवस्थापक शेषराव पाटील उपस्थित होते.

Protected Content