पाचोरा प्रतिनिधी । शहरातील कृष्णपुरी भागातील रहिवासी असणारे जवान मनोहर पाटील हे सेवानिवृत्त होऊन गावी आल्यावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
जय हिंद मित्र मंडळ व आर्मी ग्रुप तर्फे आगळा-वेगळा उपक्रम देशसेवेच्या रक्षणांसाठी गेलेल्या गावातील युवकांचा (जवान) चा देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर जन्मभूमीत वाजत गाजत गावभर मिरवणूक काढण्यात आली आहे. जवान मनोहर पाटील यांनी शहरात आल्यावर पहिल्यांदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार हर्पण करून अभिवादन केले. यानंतर भारत मातेच्या जयघोषात मिरवणुकीस सुरवात झाली. त्यांच्या स्वागतासाठी नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सतीश चढे, संभाजी बिग्रेडचे राजेंद्र पाटील, नाना चौधरी, सुनील पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील, भूषण देशमुख, दीपक पाटील, राहुल बोरसे, विनोद देवरे, रवींद्र देवरे, सुधाकर महाजन, पप्पू जाधव, ज्ञानेश्वर महाजन, अशोक निंबाळकर, विकी मराठे, रवी ठाकूर, सचिन पाटील, अनिल भोई आदी उपस्थित होते.
जवान मनोहर पाटील हे येथील महाराष्ट्र परिवहन महामंडळात सेवा निवृत्त मधुकर धाकू पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण प्राथमिक तर माध्यमिक येथे झाले. नंतर ते सैन्यात २००३ मध्ये भरती झाले. ते १ फेब्रुवारी २०१९ सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्त निमित्ताने जवान मनोहर पाटील यांची शहरात बँड पथक लावून देशभक्तीच्या गजरात गावभर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे घरोघरी औक्षण करून स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीचे आयोजन जयहिंद मित्र मंडळ, आर्मी ग्रुप, मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, छत्रपती शिवाज महाराज रिक्षा स्टॉप यांनी संयुक्तरित्या केले होते.