संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त रविवारी ८ डिसेंबर रोजी ३.३०वाजता सवाद्य भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त शारदा एज्युकेशनल फाउंडेशन च्या वतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे सदर मिरवणूक पांजरापोळ चौक नेरी नाका येथून सुरू होईल व कालिका माता मंदिर परिसरातील संताजी जगनाडे महाराज बगीचा या ठिकाणी समारोप होईल तरी सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने जयंती उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर यांनी केले आहे

Protected Content