Home धर्म-समाज संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा 

संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा 


 रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  रावेर शहरात संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. भाविकांच्या सहभागाने शहरात सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद चौकातील थड्याजवळील मारुती मंदिरात झाली, जिथे संत सावता माळी यांच्या मूर्तीवर माळी समाज पंच मंडळाचे सदस्य नितीन महाजन यांनी पत्नीसमवेत अभिषेक पूजन केले. त्यानंतर सजविलेल्या पालखीत संत सावता माळी यांची मूर्ती व प्रतिमा ठेवण्यात आली आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या शोभायात्रेत श्रीराम भजनी मंडळ व श्रीराम दूत हनुमान चालीसा मंडळ पालखीच्या अग्रभागी सहभागी होते. ढोल-ताशा, टाळ-मृदुंग यांच्या गजरात भक्तगणांनी जयघोष करत मार्गक्रमण केले. शोभायात्रेने शहराच्या प्रमुख मार्गांवरून वळसा घेत पुन्हा थड्याजवळील मारुती मंदिरात प्रवेश केला. तेथे आरती, पूजन व दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला, तसेच प्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

या प्रसंगी माळी समाज पंच मंडळाचे विश्वस्त प्रल्हाद महाजन, अध्यक्ष नितीन (बंटी) महाजन, माजी अध्यक्ष प्रभाकर महाजन, संजय महाजन, पद्माकर महाजन, हभप कांतिलाल बुवा, उमेश महाजन, विनोद पाटील, रविंद्र शिवाजी महाजन, प्रशांत पाटील, रविंद्र पाटील, हितेश मानकरे, अक्षय मानकर, संजय महाजन, प्रकाश महाजन, लखन महाजन, सुखालाल महाजन, प्रल्हाद पाटील, दिवाकर महाजन, ई. जे. महाजन तसेच प्रताप व्यायाम शाळेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, योगेश महाजन, निलेश पाटील यांच्यासह पंच मंडळाचे अनेक सदस्य, महिला आणि शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शोभायात्रेने रावेर शहरात धार्मिक एकतेचे दर्शन घडवले. संत सावता माळी यांच्या कार्याचा गौरव करत शहरभर आनंद आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound