यावल येथे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

83bceca6 38a2 48dc ab3d 930b904cd384

यावल (प्रतिनिधी) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्त शिवसेना व युवासेनेतर्फे शनिवारी (दि.२३) सांयकाळी ६.०० वाजता शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली.

 

शहरातील सातोद रस्त्यावरील शनी मंदिरात पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी व निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मिरवणुकीला शनी मंदिरापासुन सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये डिजीटल बॅन्ड, सजीव देखावा आणि ट्रॅक्टर – ट्रॉलीवर शिवाजी महाराज यांची प्रतीमा ठेवण्यात आली होती.
शिवाजी महाराजाच्या भुमिकेत प्रविण बडगुजर, दोन मावळ्याच्या भुमिकेत किरण कुंभार व अजय कुंभार यांनी सजीव देखाव्यात भुमिका साकारली होती. शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष – हुसेन जहांगीर तडवी, उपाध्यक्ष – प्रवीण बडगुजर, कार्याध्यक्ष आकाश कोळी, सचिव – संतोष खर्चे, खजिनदार- जगदीश कवडीवले, सल्लागार समिती – मुन्ना पाटील, दीपक बेहडे, रवींद्र सोनवणे, पप्पू जोशी, गोठू सोनवणे, सुनील बारी, शरद कोळी, सागर देवांग, अझर खाटीक, सागर बोरसे, योगेश पाटील, मोहसीन खान, सचिन कोळी या समितीनी मिरवणुकी दरम्यान कोणताही उनुचित प्रकार घडु नये, यांची दक्षता घेतली होती. मिरवणुक शांततेत व उत्साहात संपन्न झाली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, कॉग्रेस माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेना उपजिल्हा संघटक (नगरसेवक) दिपक बेहेडे, शिक्षक सेना जिल्हा संपर्क प्रमुख भुषण नागरे, नगराध्यक्ष सौ. सुरेखा कोळी, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, शिवसेना उप तालुका संघटक सुनिल (पप्पु) जोशी, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष धोबी, उपशहरप्रमुख किरण बारी, युवासेना उपशहर अधिकारी सागर बोरसे, शिवसेना शहर संघटक सुनिल बारी, युवासेना उपशहर अधिकारी पिंटु कुंभार, सुधाकर धनगर, योगेश राजपुत, विजय कुंभार, गजु भोसले, सचिन कोळी, सागर कोळी, सुरेश कुंभार, प्रविण बडगुजर ,शकील पटेल यांच्यासह शहरातील नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भगतसिग पाटील, पुंडलिक बारी, अयाज खान शबीर खान, रझाक पटेल, किशोर कुलकर्णी , गोपालसिग पाटील , वंसत बापु भोसले , समाधान वाघ, यावल सरकल तलाठी ई.व्ही. महाडीक, तलाठी एस.व्ही. सुर्यवंशी, प्रदीप पाटील यांच्यासह शहराचे आजी माजी नगरसेवक , शिवसेनेचे व युवासेनेचे व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content