जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगावात भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शारदा एज्युकेशनल फौंडेशनच्या वतीने मंगळवार ९ डिसेंबर हा विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.

यावर्षी सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण ह.भ.प. रविकिरण महाराज (दोंडाईचेकर) यांचे अमृतमय कीर्तन असणार आहे. महाराजांच्या अमृत वाणीतून संताजी महाराजांच्या जीवनकार्याचा व संदेशाचा मागोवा घेण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जोशी पेठ येथील तरूण कुढापा मंडळ चौकात होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा एज्युकेशनल फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, उपाध्यक्ष बबन चौधरी, खजिनदार संदीप चौधरी, सहसचिव मनोज चौधरी, नियंत्रक रामचंद्र चौधरी आणि सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
या आयोजनात तेली समाजातील विविध प्रतिष्ठित संस्थांचा सक्रीय सहभाग आहे. यामध्ये तेली प्रिमियर लिग जळगाव, श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, प्रदेश तेली महासंघ, तरुण कुढापा मंडळ, जळगाव शहर तेली पंच मंडळ, आणि जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ यांचा समावेश आहे. या किर्तन सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



