यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून चोपडा, यावल विधानसभा क्षेत्रात माजी आ. जगदीश वळवी मित्र परिवार आणि डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘भव्य रोग निदान’ शिबीर आयोजित करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कार्य्रक्रमाचे उदघाट्न अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबीरात असंख्य लोकांनी आपली उपस्थितीत देत डोळे तपासणी करुन घेतली आहे. माजी आ.जगदीश वळवी, घनशाम आण्णा, जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र, साकाळी येथील माजी जि.प. सदस्य वसंत महाजन, तालूका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, डॉक्टर सेलचे कांतीलाल पाटील, तय्यब मेंबर, मौसीन खान, अयुब मिस्त्री, अष्पक मेंबर, साखळीचे प्रगतिशील शेतकरी सुभाष महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, मनवेलचे अरुण आबा, चुंचाळे येथील obc सेलचे जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, दिनू नाना, वसंत पाटील, शिरसाडचे भैय्या पाटील, कादिर तडवी, विजय सावकारे, बशीर खान, रज्जोऊ सय्यद, व सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने हजर होते.