यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील गावपातळीवरील कारभारीच्या निवडीसाठीच्या निवडणुकीला वेग आले आहे. यावल येथे भावी गाव कारभारीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ईच्छुक उमेदवारांची तहसील कार्यालयाच्या परिसरात एकच गर्दी झाली होती.
यावल तालुक्यातील साकळी ह्या निवडणुकीसाठी १७ सदस्य संख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीसह १० ग्रामपंचायतीच्या १० लोकनियुक्त सरपंच पदासह ९२ सदस्य निवडीच्या सार्वत्रिक तर नऊ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी २सरपंच पदासह १४ सदस्य असे ११ सरपंच पदाचे व १०निवडीचे प्रक्रियांतर्गत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५२ सरपंच पदाचे तर सदस्य पदासाठी २५३ आणि पोटनिवडणुकी अंतर्गत १ सरपंच पदासाठी ४ तर १४ सदस्य पदासाठी २४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असल्याने सरपंच पदासाठी एकूण ५६ तर सदस्य पदासाठी २७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
२३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भा यात्रेचे स्वरूप आले होते. तालुक्यातील साखळी या मोठ्या गावाचे ग्रामपंचायतीसह दहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर ९ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी २० ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत त्या १० गावाचे सरपंच पदासाठी २८ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १७५ आणि पोटनिवडणुकी अंतर्गत चे गावाचे सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी २१ अर्ज प्राप्त झाले, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने येथील तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांचे मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पार पाडली.