Home धर्म-समाज अ.भा. ग्राहक पंचायत बोदवड तालुका कार्यकरणी जाहीर

अ.भा. ग्राहक पंचायत बोदवड तालुका कार्यकरणी जाहीर

bodwad niwad
bodwad niwad

bodwad niwad

बोदवड प्रतिनिधी। अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकरणीची बैठक २ जून २०१९ रोजी प्रभू ऍग्रो इंडस्टीज बोदवड येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक सरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ग्राहक पंचायतीच्या तालुका कार्यकारणीवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्यांची निवड याप्रमाणे
त्यामध्ये अध्यक्षपदी सागरमल पूखराज कांकरिया, उपाध्यक्षपदी प्रशांत भिकमचंद चोपडा यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणीत तालुका संघटक नितीन कोल्हटकर, सचिवपदी मुरलीधर तोतरांम पाटील, कोशाध्यक्ष अँड अमोल परदेशी, सदस्यपदी मनोज कांकरिया, अँड.अर्जुन पाटील, रवींद्र मराठे, निलेश माळी, गोपीचंद सुरवाडे, आबा माळी, संजय वराडे, सागर बडगुजर, नंदलाल छाजेड, ज्ञानेश्वर घोगले, उमेश चोपडा, अँड. ईश्वर पाटील, प्रा,सुरेश वराडे, संदीप वैष्णव, हर्षल बडगुजर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

अभिनंदनाचा वर्षाव
बैठकीत शहरातील प्रतिष्ठित उद्योजक हरिओम जैस्वाल, जी.बी. माळी (सर), प्रा.वराडे, विजय माळी, निलेश माली यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शहरातील लोक हजर होते. यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र शासनातील राज्य अन्न आयोग आणि ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound