Home Cities जळगाव ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल येथे पदवी दिन साजरा

ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल येथे पदवी दिन साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलचा 2023 च्या बॅचचा पदवी दिन समारंभ नुकताच पार पडला. २२ मार्च २०२४रोजी शाळेत झालेल्या कार्यक्रमाला १६० पालक, पाहुणे आणि शिक्षक उपस्थित होते. सकाळची सुरुवात त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. प्राचार्य श्रीधर सुनकरी, केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील आणि केसीई सोसायटीचे एचआर मॅनेजर गोकुळ पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी गीत गायले. विद्यार्थ्यांनी त्यांचे काही शब्द सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती बत्तीसे व अर्चना पाटील यांनी केले. आभार सविता मनोरे यांनी मानले. उपप्राचार्या मॅडम चंद्रकला मॅडम यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. कुलकर्णी मॅडम, रजनी गोजोरेकर, महेश कोळी, राहुल चिमणकर, अरविंद पाटील, सिद्धेश्वर पाटील, आकाश सराफ आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी .परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound