जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आता आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची कसोटी पाहणारी ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांची तयारी पाहता भाजपकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असतांनाही ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपकडून काळजी घेतली जात आहे. खबरदारी म्हणून भाजपाने आपल्या जि.प. सदस्यांना सहलीला पाठवण्याचे नियोजन केल्याचे विश्वसनीय सुत्रानाकडून कळले आहे.
जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या निवास स्थानावर भाजपा सदस्यांना आज दुपारी २.०० वाजता बोलवण्यात आले होते. यातील काही सदस्य हे बंगल्यावर हजर झाले आहेत तर काही सदस्य जळगावच्या मार्गावर असल्याचे कळले आहे. या सदस्यांना साहिलीसाठी कुठे नेले जाणार आहे ? याबाबत मात्र गुप्तता पाळली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनी अध्यक्षपद त्याच्याकडे घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या हालचालींना यश येऊ नये, यासाठी भाजपा जि.प. सदस्यांना सहलीला पाठवले जाणार असल्याची शक्यता आहे.